सौजवार्ता
एफडीएची १२ आस्थापनांवर धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर,
(सांजवार्ता ब्युरो): एफडीएच्या वतीने शहरासह जिल्हाभर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, मिठाईधारक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत बारा आस्थापनांवर कारवाई केली
जात आहे. अन्न सुरक्षा व मानके
अधिनियम, २००६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासन, शहरातील व जिल्ह्यातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाई दुकाने, डेअरी व किराणा गोदामांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या निकषांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्दे शित अधिकारी द. वि. पाटील
या बारा आस्थापानांवर
निलंबनाची कारवाई
मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि., उस्मानपुरा इटखेडा मे. साईराज सुरुची फूड्स सर्व्हिसेस (एम.आय.टी. कॅन्टीन), बीड
यांनी १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
बायपास रोड, मे. हॉटेल न्यू राज दरबार, देवळाई, बीड बायपास रोड, मे. राजदरबार मराठा हॉटेल, शिवाजीनगर रोड, गारखेडा, मे. हरी दूध डेअरी अँड बेकर्स, आदित्य नगर, देवळाई, मे. रॉयल हॉटेल, नेहरू चौक, छावणी (कॅन्टोनमेंट), मे. केजीएन केटरर्स, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, मे. एस. के. सवेरा हॉटेल, दमडी महल, शहा बाजार,
मे. हॉटेल जयश्री फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट, मुंबई-नागपूर महामार्ग, टिडी, ता. वैजापूर, मे. टेके फरसाण अँड बाबा मिसळ पाव सेंटर, गंगापूर रोड चौफुली, ता. वैजापूर, मे. चामुंडा बिकानेर स्वीट, मुख्य रोड आळंद, मे. एफएफ सव्र्हिसेस प्रा. लि. (एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि. कॅन्टीन), एमआयडीसी वाळूज, ता. गंगापूर यांच्यावर कारवाई
करण्यात आली. यामुळे
पंधरा दिवसांच्या आत त्रुटींची पूर्तता करा
सदर सर्व आस्थापनांना अन्न तयार करणे, विक्री व वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित व्यवसाय चालकांनी १५ दिवसांच्या आत सर्व त्रुटींची पूर्तता करून पुराव्यासह अहवाल सादर करावा. फेरतपासणीनंतर समाधानकारक पूर्तता आढळल्यास आणि सक्षम प्राधिकाऱ्यांचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतरच व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल, असे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले, ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल. झाडे, प्रज्ञा प्रमोद सुरसे, वर्षा टी. रोहे आणि प्रशांत अजिंठेकर यांच्या तपासणी अहवालांच्या आधारे करण्यात आली.
जिल्ह्यातील
व्यावसायिकांमध्ये
एकच खळबळ उडाली आहे.














